वर्षा ऋतु वर निबंध मराठी |पावसाळा निबंध मराठी मध्ये | Essay on Rainy Season in marathi

नमस्कार मित्रांनो, पावसाळा निबंध मराठी मध्ये, essay on rainy season in marathi, किंवा वर्षा ऋतु वर निबंध मराठी हे नेहमी परीक्षा मध्ये विचारल्या जाणारे मराठी निबंध आहे, तर चला निबंधला सुरुवात करूया

“वर्षा ऋतूचा काळ,जणू सुखाचा संसार

                 चोहीकडे हिरवळ दाटी,अन त्यासी भरभराट सणवार्‍यांची”

मित्रांनो,पावसाळा म्हटला की मनाचा उल्हास,प्रफुल्लित परिसराची साथ,हिरवीगार वाट आणि पक्वानांचा सुवास.खरच,पावसाळ्यात खूप विलोभनीय आणि आल्हाददायक वातावरण असते.कधी रिमझिम बरसणार्‍या,तर कधी टपोर्‍या थेंबाचा वर्षाव,कधी भुरकट भुरकट,तर कधी मन वेधून घेणारा ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ,माझ्यासाठी नेहमीच सुखकारक मनाला मोहून टाकणारा माझा आवडता आणि जिवाभावाचा सखा ऋतु पावसाळा. 



कधी काळी मी व्हार्‍यांड्यात बसलो असतांना दुपारच्या वेळेला आकाशात ढग दाटून आले होते.भर दुपारी काळोख पसरला होता सुरूवातीला मंद मंद असा वारा सुटला त्या वार्‍यामुळे अंगाला झोंब आली आणि मन तृप्त झाले.क्षणातच पाहता पाहता सरसर सरसर सारी कोसळू लागल्या अन लगेचच टपोर्‍या थेंबाचा वर्षाव सुरू झाला.जवळजवळ दीड-दोन तास सारखा बरसत राहीला होता तो पाऊस.तो पाऊस म्हणजे माझा आणि माझ्या भावंडांच्या आठवणीचा क्षण.आमच्या घरासमोर तुडुंब पाणी साचले होते. त्या पावसात मी व माझे लहानसहान भावंड मनसोक्त पाऊस थांबेपर्यंत खूप नाचलो बागडलो होतो आणि त्यात भर टाकणारा आईच्या हातचा गरम चहा आणि कुरकुरीत कांदाभजी. वा! त्यादिवशी न्यारीच न्यारी आणि मज्जाच मज्जा होती.

पावसाळ्यातील प्रत्येक क्षण अन क्षण हा वहीत कोरून ठेवण्यासारखा असतो. सणवार्‍यांनी सगळ दमदमून जात त्या दिवसात.सर्वात पहीले नागोबाच आगमन,मग पोळा त्यांनंतर,श्रावण मास आणि गणेश चतुर्थी यासर्वांमुळे मन तर तृप्त होतच आणि वातावरणही आल्हाददायक राहते.एवढ सगळ मनमोहक वातावरण असुनही काय माहीत क्वचितच कुणाकुणाला वर्षा ऋतु आवडत नाही.”का??” तर फक्त सततधार बरसणार्‍या पावसामुळे त्यांची कामे बुडतात.”असो,आपल्याला काय! आपल्याला तर जाम मज्जा येते बा पावसाळ्यात”,थंडगार वारा,हिरवागार परिसर आणि गरम गरम पक्वान.

👉 नक्की वाचा चिमणीची माहिती मराठी 

    हो हे मात्र खरय,असा मृदु,मुलायम,सुखावणारा पाऊस कधी कधी आक्राळविक्राळ रूप धरण करत.मुंबई सारख्या महानगरीलाही बुडवू शकेल एवढा तो भयंकर आहे.आपणासर्वांना माहीतच आहे गेल्या काही दिवसात सतत झालेला पाऊस.त्या सतत बरसणार्‍या पावसामुळे अख्खे रस्ते तुडुंब भरले होते.खूप पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती॰हे सगळं कुणीही विसरू शकणार नाही.पण काही असो,हे मात्र माणसाच्या पर्यावरण विषयीच्या हिंसाचारमुळे निसर्गाने दिलेली शिक्षाच असावी.असा हा माणसाचा पोशिंदा,त्याला सुखदायक आणि रमणीय वाटणारा,कधी कधी कठोर शास्ताही बनतो.तो कसाही असो माझा जिवाभाचा सखा आहे.तो जेव्हा मनसोक्त बरसणार तेव्हा त्याच्यापासून दूर राहुन घरात बसण्याचा करंटेपणा मी नाही करणार!!!!!

तर मित्रांनो  पावसाळा निबंध मराठी मध्येessay on rainy season in marathi, किंवा वर्षा ऋतु वर निबंध मराठी आपल्याला आवडला असेल, वा काही आपले समाधान झाले तर असेल खाली कमेन्ट करा. आणि आपल्या मित्रांन बरोबर शेअर करा.

धन्यवाद     

टिप्पण्या

Popular Posts

मी नदी बोलते निबंध इन मराठी / essay on river in Marathi

मराठी भक्ती गीत /best marathi bhakti geet

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | bhogi chya Hardik shubhechha in Marathi