मी नदी बोलते निबंध इन मराठी / essay on river in Marathi

मी नदी बोलते.मला तर तुम्ही ओळखताच,पण काय तुम्हाला माझी वैशिष्टे तुम्हाला माहिती आहे?, नसेल माहीत तर मी आज तुम्हाला कहाणी,माझी जीवन कथा सांगते.

   मित्रांनो, तशी तर मी तुम्हाला बहुतेक ठिकाणी दिसते पण माझे उगमस्थान म्हणजे माझा जन्म हा पर्वतामध्ये झाला आणि तेथून झर्‍याच्या स्वरुपात पुढे पुढे सरकत गेली, कधी खूप वेगाने तर कधी मंद गतीने पुढे जात राहिली.पण बर का मित्रांनो,मी कधीही थांबली नाही.पुढे जाताना माझ्यासमोर खूप अडचणी आल्या जसे मोठमोठाले खडक,विशाल पर्वत,कधी भली मोठाली झाडे,पण तरी सुद्धा मी थांबले नाही. मी हळुवारपणे पुढे जात राहिली.मी स्वभावाने चंचल आहे.मला एकठिकाणी राहायला मुळीच आवडत नाही.माझ्या पाण्याचा प्रवाह संथपणे का होईना सतत चालू असतो. समोर जाता जाता माझे मिलन सागरामध्ये होवून जाते.माझे संपूर्ण अस्तित्व हे सागरामध्ये मिसळून नाहिसे होते.

मी मानवाच्या अनेक कामात उपयोगी पडते याचा एमएलए खूप आनंद व फार अभिमान आहे.मानव प्राणी हा माझा उपयोग शेतीसाठी,पिण्यासाठी तसेच अनेक जीवनावश्यक गोष्टीसाठी करतो.तसेच माझ्यामध्ये खूप जीव आढळतात,त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या आहारमध्ये करता,तुम्ही माझ्या पाण्यावर विविध प्रकल्प करून त्यापासून वीजनिर्मिती करता,त्यामुळे तुमचे जीवन प्रकाशमय झाले,त्यामुळे तुम्ही आंधरतही निवांतपणे कामे करू लागले आहात, खरच! तुमची एवढी प्रगती झाल्याचे पाहून,माझ्या पाण्याचा प्रवाह खूप खळखळाट करू लागला आहे जणू काही तो त्याचा आनंदच व्यक्त करत आहे.मलाही तुम्हा सर्वाकडे पाहून खूप धन्य वाटते.पण तुमच्यापैकी काहींनी माझा दुरुपयोग सुध्दा केला.

        

       माझी तुमच्याकडे हीच एक कैफियत आहे. मी तुम्हाला सर्वकाही पुरवत असताना सुध्दा तुम्ही मात्र माझ्या पाण्यात कारखान्याचे दूषित पाणी सोडता.माझे पाणी दुषीत करता,माझ्या स्वछ,निर्मळ पाण्याला घाण करता.एकीकडे तुम्ही मला माता म्हणता माझी पुजा करता आणि त्या पूजेचे सर्व साहित्य माझ्यातच ओतता.त्यामुळे माझ्या पाण्यात जाम बसून घाण तयार होते.मला ना पुढे सरकता येत ना मागे फिरता येत माझा प्रहाव हा जागीच थांबतो.माझ्या पाण्यातील माल कोण बाहेर काढणार? मला पूर्वीप्रमाणे स्वछ आणि निर्मळ कोण बनवणार? माझा आपल्याच लोकांकडून होणार हा घाट मला मुळीच मान्य नाही. माझ्या उपकरची ही अशी परतफेड मला खूप असहय होत आहे.पूर्वी माझ्या काठाशी खूप विरळ वस्ती होती,मोजकेच लोक राहत होते ते माझा उपयोग त्याची गरज भागवण्यासाटी करायचे.परंतु जसजसी वस्ती वाढू लागली तसतसे लोक मोठ्या वस्तीने माझ्या काठाशी राहू लागले व माझ्याच जिवावर उठले,मलाच घाण केले

जाहिरात लेखन मराठी

   असो,पण मी मात्र जंगल धोंडयातून जाण्यार्‍या रस्त्यात खूप सुखी आहे.तिथे मी स्वछ आहे व संथपणे वाहत आहे.वन्यप्राणी पाहिजे तेव्हा आपली तहान भागवतात.आपली तहान भागवून तृप्त होतात.माझ्या पाण्यामध्ये विविध जीव संचार करतात. तेथील वातावरण रम्या आहे आणि मला तेथे सुखाचा श्वास घेता येतो याची मला खूप खूप धन्यता आहे.

मित्रांनो माझी खूप इच्छा आहे की तुम्ही सुद्धा मला स्वच्छ सुंदर आणि निर्मळ बनवावे,माझ्या पाण्याचा बरपूर आस्वाद घ्यावा माझ्या खळखळ वाहणार्‍या प्रवाहामध्ये तुम्ही स्वच्छंद खेळावे.माझा पूर्वीप्रमाणे खूप उपयोग करावा आणि मी सुद्धा तुम्हाला पूर्वीप्रमाणे साथ ध्यावी तुमच्या सुखादुखात सहभागी व्हावे अशी माझी भरपूर इच्छा आहे.

सांगा तर मित्रांनो तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल ना, मला निखळ हसणार्‍या,चंचल बालीकेप्रमाणे पुन्हा खळखळ वाहू देणार ना, माझ्या उपकारची मला परतफेड देणार ना तुम्ही सर्व ! ! ! ! .... 

हे पण वाचा:: वर्षा ऋतु वर निबंध   

प्रसंग लेखन मराठी संपूर्ण माहिती               


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Popular Posts

मराठी भक्ती गीत /best marathi bhakti geet

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | bhogi chya Hardik shubhechha in Marathi